महावितरणने वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम थांबवावी : रावेरात मागणी
रावेर : रावेर तालुक्यातील शेतकर्यांना धारेवर धरीत वीज कनेक्शन कट केले जात असून महाविरणमार्फत रोहित्र बंद केल्याने खरीपाच्या हंगामाला मोठे नुकसान होत असल्याने भाजपा किसान मोर्चातर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकर्यांचे बंद केलेले रोहित्र तत्काळ सुरू न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. यावेळी निवेदनावर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी पीपल्स बँक चेअरमन अॅड.प्रवीण पाचपोहे, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, पी.के.महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी आदी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.








