धक्कादायक ! : प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात पत्नीचा खून
नवी दिल्ली : जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ खावून प्रेम विवाहात अडकलेल्या दाम्पत्याने प्रेम विवाह केला खरा मात्र लग्नाच्या आठ दिवसातच पतीने पत्नी हत्या केली. लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना दिल्लीत घडली. खुनानंतर आरोपी पती पसार झाला आहे. मोहम्मद आझाद खान (21) असे आरोपी पतीचे नाव असून त्याने पत्नी किर्ती मोहम्मद खान हिची हत्या केल्याचा आरोप आहे.
सुखी संसाराची स्वप्ने रंगवताना पत्नीचा खून
आरोपीचे किर्तीसोबत प्रेमसंबंध असल्याने उभयंतांनी आठ दिवसांपूर्वीच कोर्टात जाऊन लग्न केलं होतं आणि आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली होती मात्र लग्नानंतर मोहम्मद आणि किर्तीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात झाली. हत्या झाली त्यादिवशी देखील त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि किर्ती जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरी आले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि मोहम्मद घरातून गायब झाला होता. शेजार्यांनी कीर्तीच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. लग्नानंतर आवघ्या आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.



