यावल बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लांबवली


Woman’s Gold Chain Stolen from Yawal Bus Stand यावल (14 मे 2026) : यावल बस स्थानकावर प्रवासासाठी आलेल्या दहिगाव येथील एका महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावलला चोरट्यांचा उपद्रव वाढला
यावल बसस्थानकावर मीनाक्षी जितेंद्र पाटील (30, रा.दहिगाव, ता.यावल) ही महिला प्रवासासाठी आल्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली. या पोत मधील सोन्याचे दोन पेंडल चोरी झाले असून त्याची किंमत 12 हजार रुपये आहे.







हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !