भाजपासाठी अनुकूल वातावरणामुळे आमदार हरीभाऊ जावळे विजयी होणारच


माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा विश्‍वास : ओंकारेश्वर मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ

रावेर : विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी विजय महायुतीचाच होणार आहे, असा विश्‍वास व्यक्त करीत आमदार हरीभाऊ जावळे यांनी रावेर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून संधीचे सोन केलं आहे त्यामुळे विकासाच्या जोरावर आज भाजपासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याने विजयाबद्दल कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. विरोधकांनी अफवा पसरवल्या असल्यातरी त्यात अजिबात तथ्थ्य नाही, आमदार हरीभाऊ व माझ्यात जे संबंध आहेत ते कायम आहेत व यापुढेही राहतील त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असा आशावाही खडसे यांनी व्यक्त केला. भाजप, शिवसेना, आर.पी.आय (आठवले गट) रासप, महायुतीचे रावेर मतदार संघातील उमेदवार हरीभाऊ जावळे यांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

तामसवाडीत प्रचाराचा शुभारंभ
विजयादशमीच्या मुहूर्तावर आमदार जावळे यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला. तत्पूर्वी तामसवाडी, ता.रावेर येथील ओंकारेश्वर मंदिरावर 8 रोजी सकाळी नऊ वाजता श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.




यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, मधुकर साखर कारखाना चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, फैजपूर नगराध्यक्षा महानंदा होले, यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी, डॉ.अतुल सरोदे, विधान सभा क्षेत्र प्रभारी शांताराम भाऊ, नंदा सपकाळे, सविता भालेराव, रवींद्र पाटील, यावल सभापती पल्लवी चौधरी, रावेर सभापती माधुरी नेमाडे, जिल्हा परीषद सदस्य रजना पाटील, नंदा पाटील, आत्माराम कोळी, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, संदीप सावले, अनिता चौधरी, संचालक नरेंद्र नारखेडे, भानुदास चोपडे, जिल्हा दुध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, मिलिंद वाघुळदे, निलेश राणे, राजेंद्र चौधरी, नितीन राणे, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश भंगाळे, लक्ष्मीबाई मोरे, लताबाई कोळी, रावेर तालुका प्रमुख योगराज पाटील, यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, रासप जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार, शिवसेना जिल्हा उप प्रमुख तुषार पाटील, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव डॉ. विजय धांडे, आरपीआय तालुकाध्यक्ष अरुण गद्रे, भाजप यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे,रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.

आमदार जावळे म्हणाले नाथाभाऊ माझे भावासारखे प्रेम
आमदार जावळे म्हणाले की, नाथाभाऊ यांचे माझ्यावर सख्या भावासारखे प्रेम आहे आणि मी देखील मााझ्या सख्या भावा इतकेच अधिक प्रेम नाथाभाऊ यांच्यावर करतो मात्र विरोधकांनी आमच्या चांगल्या संबंधाबाबत अफवा पसरवल्या आहेत. कार्यकर्ते व मतदार कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये व आपल्याला विजयी करावे, असे आवाहन आमदार जावळे यांनी केले

शिवसेना युती धर्म निभावणार -प्रल्हाद महाजन
शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन म्हणाले की, राज्यातील महायुतीतील शिवसेना ही युती धर्म पाळून एक दिलाने प्रचार करेल.

यांची होती उपस्थिती
शिवसेना तालुका प्रमुख योगराज पाटील, यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, रासप जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, यावल तालुका आरपीआय तालुकाध्यक्ष अरुण गद्रे, भाजप यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजप शिवसेना व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश धनके यांनी प्रास्ताविक तर वासुदेेव नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !