27 वर्षीय विवाहिता बेपत्ता


चाळीसगाव : 27 वर्षीय विवाहिता बेपत्ता तालुक्यातील पिंपरखेड येथील 27 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील फरीदाबी शेख शेमशेर (27) ही विवाहिता शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरच्यांना मी चाळीसगाव येथे दवाखान्यात जाऊन येते असे सांगून गेली मात्र अद्यापही घरी परतल्या नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध करूनही विवाहितेचा शोध न लागल्याने फरीदाबी यांचे वडील शमशेद शेख गुलषद यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक ठाकूर हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !