कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : पाच गुरांची सुटका
शिरपूर : कत्तलीच्या उद्देशाने पिकअपमधून गुरांची वाहतूक करणार्या वाहनावर तालुका पोलिसांनी दहिवदजवळ कारवाई करीत 3 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला तसेच एकास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली. पोलिसांनी पाच गुरांची सुटका केजली आहे.
गोपनीय माहितीवरून करवाई
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गरून कत्तलीच्या उद्देशाने शिरपूर च्या दिशेने गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती एपीआय सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यावरून दहिवदलगत सर्व्हिस रोडवर सापळा रचण्यात आला. सायंकाळी पिकअप एमएच-04-जीसी-4224 आल्यानंतर त्यात पाच बैलांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या कारवाईत 30 हजार रुपये किमतीचे 5 बैल व 3 लाख रुपये किमतीची पिकअप वाहन असे 3 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच चालक रईस मजीद तेली (30, आदर्शनगर शिरपूर) यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार गंगाधर सोनवणे, कैलास पाटील, मुकेश पावरा, प्रकाश भिल यांनी केली.


