भुसावळ ग्रामीणमध्ये अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचाराचा झंझावात
वांजोळासह, गोंभी, भानखेडा, जोगलखेड्यासह सुनसगावात मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी रविवारी दुपारी भुसावळ तालुक्यातील वांजोळासह, गोंभी, भानखेडा, जोगलखेडा व सुनसगाव गावाला भेट देवून मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. याप्रसंगी त्यांनी मतदारांशी संवादही साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक समर्थकांनी त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला.
परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले म्हणाले.



