शिरपूरातील पाच तरुणांवर प्राणघातक हल्ला : सहा जणांविरोधात गुन्हा
शिरपूर : मागील जुन्या भांडणाची कुरापत काढत पाच तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना दहिवद शिवारात कारखाना वसाहत गेटजवळ सोमवारी मध्यरात्री घडली. शहरातील पाच तरुण जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिरपूर तालुक्यातील सहा जणांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी हर्षल चंद्रकांत सोनवणे (24, रा.पाटीलवाडा, शिरपूर) या तरुणाने फिर्याद दिली. दाखल फिर्यादीनुसार चार वर्षांच्या भांडणाची कुरापत काढून सोमवार, 13 रोजी मध्यरात्री 2.20 वाजेच्या सुमारास यशपाल उर्फ निखील वासुदेव राजपुत, सनी उर्फ युवराज राजपुत (रा. होळनांथे) यांच्यासह 4 जणांनी दहिवद गावातील कारखाना वसाहतच्या गेट जवळ हर्षल चंद्रकांत सोनवणे, कुणाल नंदकुमार पाटील आणि चेतन मराठे कल्पेश पाटील, सागर पाटील यांच्यावर तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांच्याने हल्ला करीत मारहाण केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी पाचही तरुण मोटरसायकल, स्कुटी गाडीने हॉटेल छत्रपती बाजुच्या सर्व्हिसरोडने शिरपुरकडे पळाले. मात्र सोनु राजपुत यांच्या कारमधून पाठलाग करीत सागर पाटील, कल्पेश पाटील यांच्या स्कुटीला कारने धडक देत उडवले तसेच अंगावर गाडी घालून गंभीर दुखापत करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी यशपाल उर्फ निखील वासुदेव राजपुत, सनी उर्फ युवाज राजपुत, सोनु राजपुत (रा.आढे ह.मु. सुरत), विशाल मानसिंग गिरासे (रा.आढे, ह.मु.बारडोली) श्रीपाद राजपुत (रा.सावळदे), रोशन सुदामसिंग चौधरी (रा.होळनांथा) यांच्याविरुद्ध कलम 307 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


