भाजपचे आमदार नितेश राणेंच्या जामिनावर उद्या सुनावणी


मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर गुरुवार, 30 रोजी सुनावणी होणार आहे. राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आजचा युक्तिवाद संपला असून, उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहे. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळणार की नाही हे उद्याच कळणार आहे. दरम्यान, कोर्टातील सरकारी वकिलांचा आजचा युक्तीवाद संपला आहे. याप्रकरणी तीन तास सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला तसेच यावेळी त्यांनी नितेश राणेंचे वकिल संग्राम देसाई यांचे मुद्दे खोडून काढले. नितेश राणे हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितले.

वकीलांमध्ये खडाजंगी
सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली. याप्रकणी सरकारी वकील हे वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत, आमच्याविरोधात तक्रार का केली नाही? असा सवालही नितेश राणेंच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात नितेशला अडकवण्याचा खोटा प्रयत्न केला जात आहे. सरकारी वकिलांनी जो युक्तीवाद केला, त्यामधील मुद्दे खोडून काढल्याचे यावेळी नितेश राणेंचे वकिल देसाई यांनी सांगितले.



निवडणुकीत झाला हल्ला
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. संतोष परब यांच्या बाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झाला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !