दहावी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के : सावित्रीच्या लेकीच टॉपर


नाशिक (8 मे 2026) : दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आाल. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला. यंदाही निकालाच्या शर्यतीत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यातील एकूण 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, अनेक विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

सकाळीच उपलब्ध झाला निकाल
मंडळाने सुरुवातीला दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन पाहता येईल असे जाहीर केले होते. मात्र, ऐनवेळी संकेतस्थळावर (वेबसाईट) वाढणारे ट्रॅफिक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता लक्षात घेता, मंडळाने तातडीचा निर्णय घेत सकाळी 11.30 वाजल्यापासूनच निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.



कोकणची बाजी
विभागावार निकालात 97.62 टक्क्यांसह कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

संभाजीनगर सर्वात मागे
राज्यातील सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) लागला आहे.

एकूण 64 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

असा आहे विभागानुसार निकाल-

कोकण : 97.62 टक्के

कोल्हापूर : 95.47 टक्के

मुंबई : 94.97 टक्के

पुणे : 94.24 टक्के

नाशिक : 90.53 टक्के

अमरावती : 90.50 टक्के

नागपूर : 89.07 टक्के

लातूर : 88.42 टक्के

छत्रपती संभाजीनगर : 88.41 टक्के

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !