तळवेलकरांचा पाणी प्रश्न सुरळीत होणार : पालकमंत्र्यांचे आश्वासन
भुसावळ : तालुक्यातील तळवेल गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शिष्टमंडळाने साकडे घातले असता पालकमंत्र्यांनी जीवन प्राधिकरण विभागाला लागलीच निर्देश दिल्याने तळवेलकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. लवकरच गावातील पाणीप्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्याअभावी हाल
31 गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीए योजना कार्यान्वीत होऊन पाच वर्ष झाले मात्र अद्यापही गावाला पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाणी वाहून नेणारी पाईपलाईन ही पाण्याच्या प्रेशरमुळे वारंवार फुटत असल्याने टाकण्यात आलेली पाईप लाईन बदलून चांगल्या प्रतीचे पाईप टाकावेत, अशी मागणी तळवेल सरपंच, ग्रामपंचात सदस्य व नागरीकांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. मागणीची दखल घेत जीवन प्राधिकरण योजनेचे अधिकारी निकम यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा करीत पाणी प्रश्न सुरळीत करण्याचे आदेश दिले. दरम्यान, तलवेळ येथील शेत रस्त्याचे काम करून मिळणार असल्यानेही समाधान व्यक्त होत आहे.


यांची होती उपस्थिती
यावेळी तळवेल येथील उपसरपंच उल्हास भारसके, ग्रामपंचायत सदस्य संजय चौधरी, उपतालुका संघटक प्रकाश कोळी, भुराभाऊ धरणे व विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.
