केंद्रीय आरोग्य मंत्री स्पष्टच म्हणाल्या ; केंद्र निधी देत नाही म्हणता मग दिलेल्या निधीचा का नाही केला वापर
राज्यात केंद्राचा पन्नास टक्के कोविड निधी वापराविना पडून असल्याने आश्चर्य
नाशिक : एकीकडे केंद्र निधी नाही म्हणायचे आणि दुसरीकडे केंद्राने दिलेला निधी देवूनही वापरायचा नाही, हे योग्य नाही, असे स्पष्ट बोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Dr.Bharti Pawar) यांनी सुनावले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यांना देण्यात येणार्या ईसीआरपी – इमर्जन्सी कोविड रीस्पॉन्स पॅकेजमधील 50 टक्के निधी महाराष्ट्र शासनाने वापरला नसल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केला. या निधीतून राज्याला पहिल्या टप्प्यात 1185.12 कोटी, तर दुसर्यात 820.77 कोटी रुपयांची तजवीज केंद्राने केली, मात्र राज्याने 21 सप्टेंबरपर्यंत फक्त 410.39 कोटी रुपये खर्च केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्याच्या आरोग्य सचिवांसह वरिष्ठ अधिकार्यांसोबत त्यांनी याबाबत बैठक (Mitting) घेतली.
आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा
डॉ.पवार (Dr.Bharti Pawar) यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यात केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्या ईसीआरपी – इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्रोग्राम – अंतर्गत देण्यात येणार्या निधीच्या वापरात महाराष्ट्राला येणार्या अडचणींवर चर्चा करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. कोविड केअर सेंटर्स, कोविड रुग्णालये, (Covid Hospital) ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स, टेस्टिंग किट्स या पायाभूत व अत्यावश्यक घटकांसाठी हा निधी तयार करण्यात आला आहे.


आता उपचार करणार की व्यवस्था?
या निधीतून कोविडसाठीच्या अत्यावश्यक सुविधा उभ्या करणे अपेक्षित होते. मात्र, महाराष्ट्राने (Maharashtra) याचा फारच कमी उपयोग केला आहे. मार्चपर्यंतच याची मुदत आहे. त्यामुळे मी राज्याच्या आरोग्य सचिवांसह वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. आरोग्यमंत्री टोपे यांनाही या बैठकीचे निमंत्रण दिले, मात्र अन्य कामामुळे ते सहभागी होऊ शकले नाही. राज्य निधीचा वापर करीत नसेल आणि केंद्र निधी देत नाही, अशी कोरडी ओरड करीत असेल तर ते योग्य नाही, असेही डॉ.भारती पवार (Dr.Bharti Pawar) म्हणाल्या.
