आदिवासी प्रवृत्तीविरोधात द्वेषापोटी कारवाई करणार्या प्रवृत्तीचा निषेध
मुक्ताईनगर : तहसील कार्यालयात आदिवासी कोळी समाजाच्या लोकप्रतिनिधींचे जात प्रमाणपत्र बोगस आहे, असे संबोधून केवळ राजकीय द्वेषापोटी कारवाई करण्याची मागणी करणार्या व वेगवेगळ्या माध्यमातून आदिवासी कोळी समाजावर अन्याय करणार्या प्रवृत्तींविरोधात जोरदार आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले.
या कारणास्तव केला जाहीर निषेध
चिखली, ता.मुक्ताईनगर येथील सरपंच राजेंद्र कांडेलकर यांचे जात प्रमाणपत्र बनावट असलेचा आरोप करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी चिखली, ता.मुक्ताईनगर येथील काकडे नावाच्या ग्रहस्ताने वृत्तपत्राच्या माध्यमातून केली होती. त्याचा जाहीर निषेध नोंदवत सदर निवेदन देण्यात आले. आदिवासी कोळी समाजाकडे आदिवासी असल्याचा ठोस पुरावा असणार्या ईनामी जमिनीची 36 अ च्या नोंदी करवून घेण्यास टाळाटाळ करणार्या महसूल कर्मचार्यांनाही तहसीलदार यांच्या माध्यमातून आदेश देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी डॉ.दिलीप तायडे, नितीन कांडेलकर, गोपाळ सोनवणे, राजेंद्र कांडेलकर, संजय कांडेलकर, गुणवंत पिवटे, नरेंद्र तायडे, महेंद्र मोंढाळे-कोळी, राजू सांगळकर, संजय कोळी, निलेश शिरसाठ, दीपक कांडेलकर, अर्जुन सांगळकर, कठोरे, शिवा पाटील, दीपक कोळी, सपकाळे आप्पा, सूर्यकांत पाटील, गोपाळ पुरकर, रोशन सोनवणे, वासु कोळी, मनोज तायडे बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.


