जिल्ह्यात शेतकर्यांना न्याय मिळवून देणार : रवीकांत तुपकर
मुक्ताईनगर : केळी पीक उत्पादक शेतकर्यांचा प्रश्न असो की, कापूस उत्पादकांचा, प्रत्येक शेतकर्याच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी असून जिल्ह्यातील शेतकर्यांचे सर्व प्रश्न सोडवले जावून त्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी येथे दिली. मुक्ताईनगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरूवारी विश्रामगृहावर पत्रकार परीषद झाली. याप्रसंगी ते बोलत होते.
शेतकर्यांना जागृत करून न्याय देणार
याप्रसंगी रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले की, संपूर्ण राज्यभरात आमचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जोमात काम सुरू आहे. मुक्ताईनगर तालुक्यात नव्हे तर खान्देशामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद काय आहे आणि शेतकर्यांच्या हितासाठी स्वाभिमानी संघटना काय करू शकते ? हे दाखवून दिले जाईल. जिल्ह्यात आगामी काळात संघटनेची ताकद वाढवण्यात येणार असून खान्देशातील केळी उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी आता प्रयत्न करण्यात येतील. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विवेक सोनवणे (Dr.Vivek Sonawane) यांच्या नेतृत्वात पूर्ण जिल्हा पिंजून काढून गावा-गावांमध्ये बैठका घेऊन जिल्हाभरातील शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यांची होती उपस्थिती
पत्रकार दिनानिमित्त मुक्ताईनगर तालुका पत्रकारांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, उत्तम जुमळे, सचिन पाटील, सुरेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
