उचंद्यात श्री कानीफनाथ महाराजांच्या मूर्तीची चोरी : दोघे जाळ्यात
तीन तासात संशयीताच्या घरातून पोलिसांनी मूर्ती घेतली ताब्यात : पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मुक्ताईनगर : तालुक्यातील उचंदे गावातील श्री कानीफनाथ महाराज (Shri Kanifnath Maharaj) मंदिरातील श्री कानीफनाथ महाराजांची मूर्ती चोरीला गेल्याची घटना शुक्रवार, 7 रोजी पहाटे उघडकीस आल्यानंतर भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली. पोलिस प्रशासनाने वेळीच धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांच्या ताब्यातून मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
बेरोजगारांना मोठी संधी : रेल्वेत तब्बल एक लाख २४ हजार जागांसाठी भरती
तातडीने फिरवली तपासचक्रे
मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, हवालदार संतोष चौधरी, संदीप खंडारे, रवींद्र मेढे, अभिमन पाटील, नितीन चौधरी, गणेश मनुरे, मंगल पारधी आदींनी धाव घेत तपासचक्रे गतिमान केली. उचंदा गावातील भागवत पांडुरंग पाटील व समाधान कडू भोलाणे या दोघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी भागवत पाटील (Bhagwat Patil) यांच्या घरातून मूर्ती हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी पोलिस पाटील जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.
2015 मध्येही घडली होती घटना
संशयीत आरोपी भागवत पाटील यांचे वडील पांडुरंग पाटील यांनी श्री कानीफनाथ महाराजांची मूर्ती (Shri Kanifnath Maharaj Murti) सुमारे 20 वर्षांआधी मंदिराला दान दिली होती. तीच मूर्ती भागवत पाटील याने चोरुन घरी नेली. डिसेंबर 2014 मध्ये श्री कानीफनाथ महाराजांची मूर्ती चोरीला गेली होती मात्र एका मनोरुग्णाने ही मूर्ती नेल्याचे उघडकीस आल्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा मंदिराजवळ (Temple) आणून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
माजी मंत्री गिरीश महाजनांना कोरोनाची लागण


