‘नाथाभाऊ’ दिनदर्शिकेचे विमोचन
भुसावळातील सुहर्ष फाऊंडेशनचा उपक्रम
भुसावळ : शहरातील सुहर्ष फाऊंडेशनतर्फे ‘नाथाभाऊ दिनदर्शिका 2022’ चे विमोचन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सुहर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित बर्हाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाथाभाऊ दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते मुक्ताईनगर येथे करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या अॅड.रोहिणी खडसे- खेवलकर, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक सुनील नेवे, पंचायत समिती सदस्य सुनील महाजन, माजी उपसभापती गोलू पाटील, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, सुमित बर्हाटे आदी उपस्थित होते.


