भिक्षुकी मागणार्याचा खून : आरोपी जाळ्यात …या शहरातील धक्कादायक घटना
होळनांथे : भिक्षुकी करणार्या 55 वर्षीय वृद्धाचा काठीने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरात गुरुवारी घडली. या प्रकरणी संशयीताविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
होळनांथे गावातील धक्कादायक घटना
चैन्या आरश्या पावरा (55) हे भीक मागून उदरनिर्वाह करीत होते. संशयीत कालू याच्या घरी ते भीक मागण्यासाठी गेल्याने आरोपीला राग आला व त्याने चैन्या पावरा याच्या डोक्यावर तसेच तोंडावर काठीने तीन ते चार वार केले. यात चैन्या जागीच कोसळले. रक्तबंबाळ झालेल्या चैन्या यांना अर्धमेल्या अवस्थेत कालूने ओढत घरापासून काही अंतरापर्यत नेले. त्यानंतर गटारीजवळ सोडून संशयीताने पळ काढला मात्र चैन्या यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत चैन्या याचा भाऊ रामसिंग आरश्या पावरा (60) यांच्या तक्रारीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित कालूला अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे करीत आहेत.


