भुसावळात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


भुसावळ : म्युन्सीपल हायस्कूलमध्ये भुसावळ तालुका व जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जाते. अध्यक्षस्थानी भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे.पी.सपकाळे होते. उद्घाटक म्हणून जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सरचिटणीस जी.आर.चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसरचिटणीस एस.पी.भिरूड, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे सरचिटणीस नितीन भालेराव, एन.बी.किरंगे, अनिल गुरचळ, म्युन्सीपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललित फिरके, संत गाडगे महाराज हायस्कूलच प्रमोद आठवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.एस.के.भटकर भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक एल. एन.फिरके यांनी केले.

या गटात झाल्या वक्तृत्व स्पर्धा
तीन गटात वक्तृत्व स्पर्धा झाल्या. त्यात पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रथम गटासाठी संस्काराचे महत्त्व, द्वितीय गटासाठी आवडता समाज सुधारक, तृतीय गटासाठी अवयव दान व देहदान काळाची गरज हे विषय होते. स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन रेखा सोनवणे तर आभार नितीन भालेराव यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !