तरुणाच्या हातातून धूम स्टाईल मोबाईल लांबवला : यावल शहरातील घटना
यावल : रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जाणार्या तरुणाच्या हातातून मोबाईल दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी धूम स्टाईल लांबवला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा
मोहम्मद तौफीक इसहाक कच्छी (21, रा.डांगपुरा, यावल) हा तरुण शनिवार, 8 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास यावल शहरातील मनुदेवी मंदिराच्या समोरून जात असताना मित्राचा फोन आल्यानंतर त्याच्याशी बोलत असतानाच पाठीमागून धूमस्टाईल दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी 12 हजार 400 रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शनिवारी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.


