दारू दुकानांबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान ; म्हणाले…!


जालना : राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असतानाच ठाकरे सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील दारू दुकानांवर होणारी गर्दी पाहता त्या ठिकाणी निर्बंध लावण्याच्या काहीच अडचणी नाहीत, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. टोपे म्हणाले की, दारूची दुकाने किंवा वाईन शॉपवर गर्दी होत असेल तर, गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावायला हरकत नाही तसेच लागू होणाऱ्या निर्बंधांना नागरीकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील राजेश टोपे यांनी केली आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन
प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. टोपे म्हणाले, मंदिर किंवा धार्मिक स्थळी एकावेळी जास्त गर्दी करू नये. नव्या नियमावलीनुसार मंदिर बंद केले नाहीत पण सामाजिक अंतर पाळून एकावेळी 40 ते 50 च्यावर संख्या असू नये.



संसर्ग टाळण्यासाठी निर्बंध महत्त्वाचे
सरकार मनमानी करत आहे. निर्बंधाबाबत विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाहीत या विरोधकांच्या आरोपावर बोलताना टोपे म्हणाले, आपण सगळ्यांनाच विश्वासात घेतो. पण दररोज आकडे 40 हजारांच्यावर जात असतील तर संख्येच्या माध्यमातून काळजीचे कारण आहे म्हणून संसर्ग टाळण्यासाठी हे निर्बंध महत्त्वाचे आहेत.

आजपासून कडक निर्बंध
राज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परीस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शनिवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !