आमदार नितेश राणे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा !
मुंबई : संतोष परब (Santosh Parab) हल्ल्याप्रकरणी अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आमदार नितेश राणेंवर (Mla Nitesh Rane) असलीतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयामुळे तूर्त त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
सोमवारी होणार फैसला
दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना म्याँव म्याँव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करणयात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या (Mla Nitesh Rane) वतीनं करण्यात आला. त्यावर संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरण हे त्या आधीचं असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचं राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार असलेतरी या कालावधीत आमदार नितेश राणेंना (Mla Nitesh Rane) अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे.


अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत सतीश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर प्राणघातक हल्ला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक झाली आहे. या प्रकरणात नितेश राणे (Mla Nitesh Rane) उर्फ संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे.
