भुसावळ ग्रामीणमध्ये आमदार संजय सावकारेंच्या रॅलींना प्रतिसाद
आमदारांनी साधला मतदारांशी संवाद : प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत : सुवासिनींनी औक्षण करीत दिले आशीर्वाद
भुसावळ : विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना, रीपाइं रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 13 तसेच तालुक्यातील कंडारी, वरणगाव आदी परीसरात प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी ठिकठिकाणी प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तर सुवासिनींनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वादही दिले. आमदारांनी प्रसंगी मतदारांशी संवादही साधला.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
भुसावळ तालुक्यातील कंडारीत निघालेल्य आमदारांच्या प्रचार रॅलीत सरपंच संदीप शिंगारे, माजी सरपंच डॉ.सूर्यकांत पाटील, माजी उपसरपंच यशवंत चौधरी, संजीव तायडे, दिलीप कोळी, हर्षल नारखेडे, दीपक तायडे, राकेश महाजन, अरविंद पाटील, खडका येथील भैय्या महाजन, चुडामण भोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.



भुसावळात आमदारांचे उत्स्फूर्त स्वागत
भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमदार सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे मतदारांनी स्वागत केले. या रॅलीत भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, किरण कोलते, मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे गुड्डू अग्रवाल, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे गडकरी नगर परीरातही शुक्रवारी सकाळी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे व शिवसेना माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या नेतृत्वात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये प्रमोद सावकारे, नगरसेवक मनोज बियाणी, पिंटू (निर्मल) कोठारी, युवराज लोणारी, रामदास सावकारे, गुड्डू अग्रवाल, संजय आवटे, पराग भोळे, शिवसेनेचे माजी शहर उपप्रमुख हेमंत खंबायत, वांजोळा माजी सरपंच नरेंद्र पाटील, नगरसेवक अमोल इंगळे, अनिल लाहोटी, सुभाष पेंढारकर, प्रेम आवटे, रतन झांबरे, रवी लेकुरवाळे, कौतीकपाटील, अनिकेत पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैलेजा पाटील, अलका शेळके, नगरसेविका मंगल आवटे, मयुरी पाटील यांच्यासह शेकडो नागरी सहभागी झाले. विविध ठिकाणी भाजपा-शिवसेना आरपीआय, रासप, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परीसरातील मतदारांशी संवाद साधला. फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार सावकारे यांचे ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले तर महिलांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.

