थोरगव्हाण विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषय मार्गदर्शन


थोरगव्हाण, ता.रावेर (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासोबतच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावातील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. पाटील होते. त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे स्वागत करून किशोरवयीन मुलींसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले.




ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.श्रीकांत जैस्वाल यांनी विद्यार्थिनींना किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, पोषण, आरोग्याची काळजी तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी कझत लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. किशोरवयात कझत लसीकरण केल्यास भविष्यातील संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही त्यांनी माहिती दिली. आरोग्यविषयक कोणतीही समस्या उद्भवल्यास संकोच न करता पालक, शिक्षक किंवा आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाचे कैलास आदीवाल, ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.कुरकुरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्य जागरूकता वाढविण्यासोबतच वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !