‘जंक्शन’मध्ये गणेशोत्सवात उपद्रवींना ‘नो एंट्री’ !

भुसावळात 89 उपद्रवी व्यक्तींवर शहरबंदीची कारवाई प्रस्तावित ; सहा दारू विक्रेत्यांवरही प्रतिबंधात्मक पाऊल


भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : लाडक्या गणरायाच्या उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तीभावाने सुरूवात होत आहे. या उत्सव पर्वात शहर व विभागात शांतता अबाधीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोर नियोजन करीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील तब्बल 89 उपद्रवींना उत्सव काळात शहरबंदीचे प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सादर केले आहेत.

याशिवाय अवैध अथवा बेकायदा दारू विक्रीला आळा घालण्यासाठी सहा दारू विक्रेत्यांविरुद्धही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे




असे आहेत प्रस्ताव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील भागांसह संभाव्य उपद्रवी व्यक्तींची माहिती संकलीत करून त्यांना उत्सव काळात शहराबाहेर ठेवण्याचे पोलीस प्रशासनाचे नियोजन आहे. त्यात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडून 46, भुसावळ शहर ठाण्याकडून 10, भुसावळ तालुका ठाण्याकडून चार व नशिराबाद ठाण्याकडून 29 प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सूत्र म्हणाले.

गणेश मंडळांचे कार्यक्रम, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे. प्रस्तावित शहरबंदीच्या आदेशानंतर संबंधित व्यक्तींना 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान भुसावळ शहर व परिसरात प्रवेश करता येणार नाही, अशी कार्यवाही अपेक्षित आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !