गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशींची चोरी
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकर्याच्या खळ्यातील गोठ्यात बांधलेल्या 65 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पशूधन चोरी करणारी टोळी सक्रिय
नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवासी सुरेश लिलाधर झोपे (63) यांचा शेती व गुरे पालन हा व्यवसाय आहे. गुरुवार, 13 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या दोन म्हशी गावाबाहेर असलेल्या खळ्यात बांधल्या असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 65 हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवार, 14 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आला. याबाबत सुरेश झोपे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अतुल महाजन करीत आहे.




