भुसावळकरांनो ही तर धोक्याची घंटा : भुसावळसह जळगावात आढळले 377 रुग्ण
जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) सुसाट पसरत असून भुसावळात तर सलग चार दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांकडून अधिक कोरोना (Corona) संक्रमण पसरत असल्याची भीती आहे. जळगाव जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात तब्बल 377 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह (Bhusawal) जळगावात (Jalgaon) सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
आतापर्यंत 2580 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 44 हजार 805 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 379 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शनिवारी 46 रुग्णांनी कोरोनावर (Corona) मात केली.
या शहरात आढळले नव्याने (Corona) बाधीत
जळगाव शहर 155
जळगाव ग्रामीण 09
भुसावळ 144
अमळनेर 13
चोपडा 15
पाचोरा 01
भडगाव 07
धरणगाव 01
यावल 02
एरंडोल 03
जामनेर 02
रावेर 03
पारोळा 01
चाळीसगाव 20
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 01


