माझ्याशी लग्न कर अन्यथा….. ; जळगावातील तरुणाविरोधात गुन्हा


जळगाव : ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकीन’ अशी धमकी देणार्‍या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिसात तरुणाविरोधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीला थेट धमकी
शहरातील जुन्या जळगाव भागातील रेहान शेख या तरुणाने शहरात राहणार्‍या एका तरुणीचा फोन नंबर मिळविला. त्यानंतर फोनवरून संवाद साधत तू मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरत तरुणीने आपल्या कुटुंबियांना ही घटना सांगितली. या संदर्भात शनिवार, 15 जानेवारी रोजी सायंकाळी रेहान शेख याच्याविरोधात एम.आय.डी.सी. पोलिसात तरुणीच्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहेत.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !