शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांना कोरोना


पारोळा : शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

संपर्कात आलेल्यांना आवाहन
गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेले अधिकारी, कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींनी आपली तपासणी करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) यांनी केले आहे.





लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण
ठाकरे सरकारमधील 25 हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळे लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, नितीन राऊत, सुनील केदार, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, अनिल परब, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ यांच्यासह काही राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती तर अलिकडेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांची चाचणीही पॉझीटीव्ह आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !