जळगावात सुरक्षा रक्षकाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : शहरातील खोटेनगर भागातील सुरक्षा नगरातील रहिवासी असलेल्या रवींद्र पुंडलिक बागुल (50) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
बँकेत होते सुरक्षा रक्षक
रवींद्र बागुल एका बँकेत नोकरीला होते. ते सुरक्षा नगरात पत्नी वंदना, मुलगा ज्ञानेश्वर व मुलगी आरती यांच्यासह वास्तव्यास होते. घराच्या वरच्या मजल्यावर रवींद्र बागुल तर तळ मजल्यावर त्यांचे भाऊ राजेंद्र बागुल वास्तव्याला आहेत. रवींद्र बागुल यांनी सोमवारी सकाळी सहा वाजता गळफास घेतल्याचे उघड झाले.




पोलिसांनी घेतली धाव
जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बागुल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परीवार आहे. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
