पहिली ते बारावीपर्यंत शाळा या तारखेपासून होणार सुरू : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यास ंदर्भात माहिती दिली. राज्यात सोमवार. 24 तारखेपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना शाळा बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.
स्थानिक प्रशासनाला दिले अधिकार
राज्यातील शाळा आता सोमवार, 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला दिली दिल्याने सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.


मंत्री आदित्य ठाकरेंनीही दिले होते संकेत
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बुधवारी शाळा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले होते. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरे यांची बैठक होवून त्यात शाळांच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली होती.
