बोदवड नगरपंचायतीच्या शिवसेना गटनेतेपदी आनंदा पाटील


बोदवड : बोदवड नगरपंचायतील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचा गट नोंदणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यात शिवसेनेचे 17 पैकी 9 नगरसेवक निवडून आल्यामुळे सेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शिवसेना गटनेतेपदी आनंदा पाटील यांची तर उपगटनेतेपदी बेबीबाई माळी यांची निवड करण्यात आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गट स्थापन करून जिल्हाधिकार्‍यांकडे त्याची नोंदणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
गटामध्ये गटनेते आनंदा पाटील, उपगटनेते बेबीबाई माळी, शारदा बोरसे, सईद बागवान, बेबीबाई चव्हाण, मंजुषा बडगुजर, मीरा माळी, रेखा गायकवाड, पूजा जैन या नऊ नगरसेवकांचा समावेश आहे. यावेळी आनंदराव देशमुख, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, तुषार बोरसे, देवेंद्र खेवलकर, शांताराम कोळी, पियुष मोरे, संदीप वानखेडे, दिनेश माळी, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर, निलेश माळी, प्रीतेश जैन, कलिम शेख, गोपाल पाटील, गणेश भोई, शरीफ मण्यार, जमील बागवान, मनोज पाटील, मोहसीन बागवान, राजू काळे हे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !