आमदार शिरीष चौधरींचा यशस्वी पाठपुरावा : यावल तालुक्यात हवामान यंत्रांच्या जागेत स्थलांतर

सदोष नोंदीमुळे शेतकर्‍यांचे होत होते नुकसान : नव्या जागा निश्चितीमुळे केळी उत्पादकांचे नुकसान टळणार


यावल : यावल तालुक्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर थंडी पडून देखील स्वयंचलित हवामान यंत्रातील दोष अभावी (Faults in the automatic weather System) शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले. स्वयंचलित यंत्रणा नागरी वस्तीत असल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला. याबाबत आमदार शिरीष चौधरी (mla shirish chudhari) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत हवामान यंत्र कंपनीला चांगलेचं खडसावले व स्वयंचलित हवामान यंत्र स्थलांतराचा मुद्दा मांडला होता. गत आठवड्यात पाहणीनंतर नुकतीच प्रत्यक्ष हवामान यंत्र स्थलांतराबाबत (Migration) कार्यवाही सुरू झाली आहे. यावल महसुल मंडळाचे यंत्र हरीपूरा येथे स्थळ निश्चित करीत कामाला सुरवात करण्यात आली. आमदार शिरिष चौधरींनी (Mla Shirish Chudhari) स्वत:हा हातात कुदळ, पावडा घेवून स्थलांतर कामाचा शुभारंभ केला.

शेतकर्‍यांना मोठा दिलासा
केळी उत्पादकांना महसुल मंडळनिहाय लावण्यात आलेले स्वयंचलित हवामान यंत्रात नोंद झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम मिळते मात्र सदोष नोंदीमुळे शेतकरी यावेळी भरपाईपासून वंचित ठरले होते. सदोष नोंदीचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यात महसुल मंडळनिहाय लावण्यात आलेले यंत्र हे नागरी वस्तीत होते. आमदारांनी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्कायमेट या कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलेच खडसावत तत्काळ सदरील यंत्रणा स्थलातंर करण्यात संदर्भात कारवाईच्या सुचना केल्या होत्या. स्थळ निश्चितीनंतर स्वयंचलित हवामान यंत्रणा नवीन ठिकाणी स्थलांतरास (Migration) सुरवात झाली आहे. आमदारांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ नुकताच झाला.



चार महसुल मंडळात स्थलांतर
हरीपुरा येथून कामास सुरूवात झाली. रावेर मतदारसंघातील चार महसूल मंडळाचे स्थलांतर केले जात आहे. हरीपुरा येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा स्वयंचलित हवामान यंत्रणा लावण्यासाठी निश्चित करून काम सुरू करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष चौधरींसह स्कायमेटचे कंपनीचे नितीन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, भरत महाजन, गोलु चौधरी, कासम बाबा, जहांगीर तडवी, वासुदेव पाटील, शामराव पाटील, जनार्दन पाटील सह कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

असे होत आहे स्थलांतर
यावल महसूल मंडळाचे स्वयंचलित यंत्र हरीपुरा () येथे, बामणोद मंडळाचे यंत्र आमोदा जुना रस्ता उपसा जलसिंचन कार्यालयजवळ तसेच फैजपूर महसुल मंडळाचे स्वयंचलित यंत्र मारूळ गावाजवळ, हंबर्डी रस्त्यावर व भालोद महसुल मंडळाचे स्वयंचलित यंत्र डोंगरदे आदिवासी पाड्या जवळील वस्तीजवळ लावण्यात (Migration) येत आहे. दरम्यान, चोपडा विधानसभा मतदार संघातील किनगाव व साकळी महसुल मंडळात देखील नागरी वस्तीत यंत्र असून त्यांच्या स्थलांत्तराचे (Migration) काय ? असा प्रश्न या भागातील शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !