महिनाभरात वीज समस्या न सुटल्यास अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : माजी मंत्री गिरीश महाजन


जामनेर : राज्य शासनाने महिनाभराच्या आत विजेच्या समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू व अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार गिरीश महाजन यांनी येथे दिला. गुरुवारी महाजन यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

दखल न घेतल्यास भव्य आंदोलनाचा इशारा
भारतीय जनता पार्टीतर्फे वीज वितरण कंपनीच्या विरोधात आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. येणार्‍या काळात जर शासनाने दखल घेतली नाही तर जिल्हास्तरावर भव्य मोर्चा काढू व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.



यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, नगराध्यक्ष साधना महाजन, जि.प.सदस्य अमित देशमुख, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, भाजपा गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, रमेश नाईक, विलास पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परीषद सदस्य, नगरसेवक, शेतकरी व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !