माजी मंत्री खडसे स्पष्ट म्हणाले ; वाट बघा, नक्की येणार सीडी !
पुणे : त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लावू, असे विधान राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती मात्र प्रत्यक्षात ही सीडी बाहेर आली नव्हती मात्र आता पुन्हा खडसे यांनी सीडी येणारच असल्याचो पुर्नउच्चार करीत थोडी वाट पाहण्याचा सल्ला दिल्याने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. ही सीडी नेमकी कुणाची व त्यात नेमके दडलेय काय? असा प्रश्न आता जिल्ह्यातील राजकारणात सुरू झाला आहे.
ओबीसींवर अन्याय ही तर वस्तुस्थिती
ओबीसी आरक्षण न मिळण्याला भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. केंद्र सरकारने ओबीसींवर अन्याय केला. वेळेवर इम्पेरिकल डेटा मिळाला असता राज्य सरकारला काही करता आलं असतं. ओबीसींवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. ओबीसींचं राजकारण कमी करण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक पाहून नाटक केलं आणि कायदा केला मात्र तो टिकणार नाही, अशी टीका एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर केली.


फडणवीसांनी गोव्यात दारू बंद करू दाखवावी
यावेळी एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी राज्य सरकारने दुकानात वाईन विक्री करण्यास दिलेल्या परवानगीबाबातही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस जर गोव्यात बसून महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र होईल, असे म्हणत असतील तर गोव्यात दारूबंदी होईल. भाजपचा कार्यकर्ता दारू पिणार नाही. भाजपची वाईनच्या बाबतीत दुटप्पी भूमिका आहे. ती त्यांनी जाहीर करावी. महाराष्ट्रात वाईनला विरोध करायचा आणि मध्य प्रदेशात बिअर विक्रीला परवानगी द्यायची. गोव्यात गल्ली गल्लीत दारू मिळते. मध्यप्रदेश हा मद्य प्रदेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात दारू विकणार नाही, असं जाहीर करावं असं आव्हान देतो. त्यांनी जाहीरनाम्यात हा मुद्दा टाकावा म्हणजे त्यांची भूमिका समोर येईल, असा घणाघात एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी केला.
सीडी येणार, वाट बघा
तसेच पुढे बोलताना त्यांनी त्यांच्याविरोधातील आरोप तसेच ईडीची चौकशी याविषयीदेखील आपली भूमिका मांडली आहे. पुरावे न देता फक्त आरोप करायचे. तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवलं आहे का ? भाजपातल्या नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे. माझी सीडी (CD) बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परीणाम होणार नाही. वाट बघा. असे खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
