अत्याचाराचा गुन्हा दाखल असणार्‍यांनी महिलांचा सन्मान शिकवू नये

मुक्ताईनगरात शिवसेना पदाधिकार्‍यांचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना टोला


मुक्ताईनगर : सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलांचा अनादर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तालुक्यातील कुर्‍हा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या सभेत केला होता. यावर प्रतिउत्तर देत सोमवारी शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक अफसरखान यांनी दिले आहे. मुक्ताईनगरात शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत ते म्हणाले की, आम्ही शिवसैनिक महिलांचा आदर करतो त्यामुळे अत्याचाराचा गुन्हा दाखल असणार्‍यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करणे शिकवू नये, असे ते म्हणाले आहेत.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसैनिक तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात अपप्रचार व दिशाभूल करणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले होते. या पत्रकार परीषदेत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान, शहरप्रमुख गणेश टोंगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, संतोष माळी, जीवराम कोळी, प्रफुल्ल पाटील आदींची उपस्थिती होती.



बाहेरून येणार्‍यांनी शिवसेनेची छबी खराब करू
यावेळी अफसर खान म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेहबूब खान यांनी मुक्ताईनगर येथील आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळाने विजय झालेले आहेत परंतु आता त्यांची भाषा बदलण्याचा आरोप केला आहे परंतु गेले 25 वर्ष शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीला मदत करण्यात आली होती. आम्ही आजही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा व पदाधिकार्‍यांचा आदर करतो व भविष्यातही करीतच राहणार आहे. त्यामुळे बाहेरून येणार्‍यांनी शिवसेनेची छबी खराब करू नये. त्यासोबतच 2024 मध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपमध्ये जातीलए असा जावईशोध ही मेहबूब शेख यांनी लावला आहे परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही कालही शिवसेनेत होतो. आजही शिवसेनेत आहोत आणि भविष्यातही शिवसेनेतच राहणार आहोत.
राष्ट्रवादीचे मेहबूब शेख हे मुस्लिम समाजाचे नेतृत्व करतात त्यांना एकच सांगायचे आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष शाहीद खान यांनी राजीनामा का दिला? याचा विचार करावा. उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला बोदवड नगरपंचायत का राखता आली नाही ? आता प्रश्नही अफसर खान यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता उपस्थित केला.

देशात दुखवट असताना संवाद यात्रा कशी?
2019 मध्ये औरंगाबाद खंडपीठात अत्याचाराचा गुन्हा दाखल असणार्‍यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करणे शिकवू नये, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने देशात दुखवटा होत असताना युवा संवाद यात्रा कार्यक्रम झाला कसा ? यावरून त्यांना महिलांचा सन्मान किती ? हे दिसुन येते, असेही खान म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !