आमदार सावकारे स्पष्टच म्हणाले : चांगली कामे न केल्यानेच लोक प्रशासक राजवट हवी म्हणताय !


भुसावळ : शहरात आता चांगली कामे होत असल्यानेच शहरात प्रशासकच हवा, असे लोक म्हणत आहे मात्र नागरीक असे बोलत असतील तर आपण कामे केलेली नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे, असा टोला सत्ताधार्‍यांचे नाव न घेता आमदार संजय सावकारे यांनी येथे मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शहरातील श्रीनगरात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी विकासकामांचा शुभारंभ झाला. याप्रसंगी आमदार जोरदार टोलेबाजी करीत पूर्वी भाजपात असलेल्या व मात्र आता राष्ट्रवादीत गेलेल्या तत्कालीन सत्ताधार्‍यांना चिमटा काढला.

25 वर्षात शहराचा विकास शून्य
आमदार सावकारे म्हणाले की, पक्ष भेद न करता कामे व्हावीत ही भावना लोकप्रतिनिधींची असली पाहिजे. मी पालकमंत्री असता नगरपालिकेला निधी देता येत नव्हता मात्र आता नियम बदलल्याने शहरासाठी निधी मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा पालकमंत्र्यांकडे केला आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, अशी मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी दखल घेतली शिवाय जामनेर रस्त्यासाठी आपण मागणी केल्यानुसार निधी देण्यात आल्याचे ते म्हणाले.



तत्कालीन सत्ताधार्‍यांवर डागली टिकेची तोफ
आमदार म्हणाले की, लोकांनी आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, स्वतःच्या विकासासाठी (वैयक्तिक गोष्टीसाठी) नाही, असे आमदारांनी सांगून खळबळ उडवून दिली. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून शहराचा विकास झालेला नाही, असे सांगून ते म्हणाले की, पक्ष भेद बाजूला ठेवून शहराचा विकास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !