नारायण राणे म्हणाले : शिवसेना नेत्यांच्या घरावर पडणार धाड


मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली असताना या ट्विटची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.

त्या आत्महत्या नसून हत्याच
सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्याविषयी ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे तसेच दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोपही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. हे ट्विट राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ‘महत्वाची बातमी’ असे म्हणत केलं आहे. तसेच ईडीची नोटीस आल्यावर विनायक राऊत आपले बॉस आणि आपण कुठे धावणार ? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे.



खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी
लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. दरम्यानख विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार ? असा इशारा राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे विरुद्ध मिलिंद नार्वेकर ट्विटर वॉर –
खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परीषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यातील ट्वीटरवरील खडाजंगी चर्चेचा विषय झाला होता. बुधवारी नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परीषदेत पूर्वी नार्वेकर हे मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे असे म्हणाले होते. यावर नार्वेकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते. बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?, असे ट्वीट नार्वेकर यांनी करत नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. नार्वेकरांच्या या ट्वीटला उत्तर देताना नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा विषय काढला होता. नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अशा किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !