Bhusawal Atikraman भुसावळातील अतिक्रमण उद्यापासून हटणार !

पालिकेची तीन दिवस मोहिम : स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे आवाहन


भुसावळ : शहरातील वर्दळीच्या सर्वच भागातील अतिक्रमण (Bhusawal Atikraman) गुरुवार, 24 पासून हटवण्यात येत असून त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. पोलिस (Bhusawal Police) प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तही मागून घेतला आहे. 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवण्यात येणार आहे.

यावल रोडपासून अतिक्रमण हटवण्यास होणार प्रारंभ
गुरुवार, 24 रोजी सकाळी 10 वाजता यावल रोडवरील गांधी पुतळा (yawal road gandhi putala) ते डी.एस.ग्राऊंड तसेच नवजीवन फर्निचर मॉल ते नाहाटा व रजा टॉवर ते खडका रोड भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत भागातील अतिक्रमण पुढील दोन दिवसात हटवण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह दुय्यम कर्मचारी, आरसीपी प्लॉटून जवान बंदोबस्तासाठी उपस्थित असतील. बुधवारी सायंकाळी पोलिस अधिकारी व पालिका अधिकार्‍यांमध्ये शहर पोलिस ठाण्यातील बैठकीत अतिक्रमण मोहिमेबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील 14 वर्षीय बालिका अत्याचारातून गर्भवती : एकाविरोधात गुन्हा 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !