भुसावळातील गावठी पिस्टल प्रकरण : अटकेतील दोघे आरोपी पोलिस कोठडीत


भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रविवारी रात्री स्टेशन रोडवर मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील दीप सिंह गुरुमुखसिंग कलानी या युवकाला चार गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केली तर या संशयीताच्या कबुली जवाबानंतर निंभोरा बु्द्रूक (ता.भुसावळ) येथील शेख हमीद याला गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह पकडण्यात आले होते. दोघा संशयीतांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गावठी शस्त्र तस्करी ऐरणीवर
रविवारी रात्री 10 वाजता बाजारपेठ पोलिसांनी दीप सिंह कलानी याला सापळा रचून अटक केल्यानंतर त्याच्याकडून चार पिस्तूल व पाच जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली होती. चौकशीत त्याने सहा महिन्यांपूर्वी भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुदूक येथील शेख हमीद याला एक पिस्टल व दोन जिवंत काडतूसे विक्री केल्याची माहिती देताच शेख हमीदला अटक करण्यात आली तर या संशयीताकडून गावठी पिस्टल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. शेख हमीदला बुधवारी न्यायालयात हजर केल्यावर शुक्रवारपर्यंत तर दीपसिंहला पुन्हा दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !