भुसावळातील जामनेर रोडवरील अतिक्रमण हटवले

कारवाईदरम्यान किरकोळ वादाचे प्रकार : अनेकांनी स्वतःहून हटवल्या टपर्‍या


भुसावळ : शहरातील सर्वच भागात वाढलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर प्रशासक राजवटीत अतिक्रमण हटाव मोहिमेला गुरुवारपासून मुहूर्त गवसला व प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी जळगाव रोडसह यावल रोडवरील 160 अतिक्रमणावर पालिकेने जेसीबी फिरवला. त्यानंतर शुक्रवारी मोहिम एक दिवसासाठी थांबल्यानंतर शनिवार, 26 रोजी सकाळपासूनच शहरातील वर्दळीच्या जामनेर रोडसह खडका रोड भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. रस्त्यांवर बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेले ढापे, टपर्‍या तसेच वेदर शेड पालिकेतर्फे जेसीबीद्वारे काढले जात आहेत.

अनेकांनी स्वतःहून काढले अतिक्रमण
वर्दळीच्या रस्त्यावरील चहाच्या टपरीसह पान टपरी, गॅरेजची दुकाने, नाश्ता सेंटर, वडापाव विक्रेत्यांनी जेसीबी मशिनद्वारे होणारे लक्षात घेता स्वतःहूनच अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ केला आहे तर ज्यांनी अतिक्रमण हटवले नाही त्यांच्या साहित्याचे मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नुकसान होताना दिसून येत आहे.

जामनेर रोडसह खडका रोडवर आज मोहिम
वर्दळीच्या जामनेर रोडसह खडका रोड भागात पालिकेतर्फे शनिवारी सकाळपासून मोहिम राबवली जात आहे. पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत मोहिम राबवली जात असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभराच्या मोहिमेनंतर मामाजी टॉकीज रोड., गवळीवाडा तसेच अन्य उर्वरीत भागातही आज वा उद्या पुन्हा मोहिम राबवून अतिक्रमण हटवण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !