भुसावळात नुपूर महोत्सवाचे 1 मार्च रोजी आयोजन


भुसावळ : शहरात सालाबादाप्रमाणे नुपूर महोत्सवाचे आयोजन महाशिवरात्री यादिवशी मंगळवार, 1 मार्च रोजी करण्यात आले आहे. या वर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शहरातील बी.व्ही.खाचणे हाल, स्वामी समर्थ मंदिराशेजारी, टिंबर मार्केट येथे सायंकाळी ठिक सात वाजता होईल. या महोत्सवात शास्त्रीय नृत्याद्वारे शीव आराधना केली जाणार असून अनेक राज्यातील कलावंत सहभागी होणार आहेत.

नृत्यश्री पुरस्काराने होणार गौरव
आतापर्यंत कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी, मणीपुरी, कथकली हे नृत्यप्रकार सादर झाले आहेत. यंदा भिलाई (छत्तीसगड) येथील शर्मिष्ठा घोष, पलक उपाध्याय, गायत्री तिवारी हे भरतनाट्यम, कुचीपुडी आणि मोहिनीअट्टम हे नृत्य प्रकार सादर करतील. नुपूर अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थिनी कथक नृत्य सादर करतील. या महोत्सवांतर्गत अभिजात भारतीय नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या कलावंतांना नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीतर्फे नृत्यश्री पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. यावर्षी हा पुरस्कार पलक उपाध्याय, प्रार्थना तिवारी, शर्मिष्ठा घोष यांना जाहीर झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !