धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू
खिर्डी : कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. 27 रोजी सकाळी साडेसात वाजेपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर ते निंभोरा दरम्यानच्या खांबा क्रमांक 473/12 ते 473/14 दरम्यान अनोळखीचा मृतदेह आढळला. अनोळखी इसमाची अद्याप ओळख पटलेली नसल्याने ओळख पटवण्याचे आवाहन निंभोरा पोलिसांनी केले आहे.


