बिग ब्रेकींग : कॉर्डेलिया क्रूझवर आर्यन खानकडे अंमली पदार्थच नव्हते !


Aryan Khan Had No Drugs On The Cordelia Cruise  मुंबई : देशभरात गाजलेल्या व सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या बॉलीवूड स्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानकडे (Aryan Khan) कोणतेही अंमली पदार्थ नसल्याची नवीन माहिती (Aryan Khan Had No Drugs On The Cordelia Cruise ) एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे तर ही बाब एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे.

क्रुझवर पडला होता छापा
आर्यन खान (Aryan Khan) , मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीनं 3 ऑक्टोबर 2021 रोजी गोव्याला जाणार्‍या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती तर उर्वरीत पाच इतर आरोपींना दुसर्‍या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजले होते. न्यायालयीन लढाईनंतर आर्यनला जामीन मिळाला होता.





समीर वानखेडेंच्या अडचणीत होवू शकते वाढ
एनसीबी एसआयटीचे अधिकारी संजय सिंह (NCB SIT officer Sanjay Singh) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एनसीबी एसआयटीची चौकशी प्राथमिक स्तरावर सुरू असल्याचे सांगत आम्ही आताच असे सांगू शकत नाही की, आमच्याकडे आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. चौकशी अद्याप सुरू असल्यामुळं आता कोणालाही क्लिन चिट देऊ शकत नाही. अद्याप आमची चौकशी अंतिम टप्प्यात आलेली नाही. संपूर्ण चौकशी होऊन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ लागणार असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, एसआयटीच्या अहवालानंतर एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !