राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना तत्काळ पदावरून हटवा

मुक्ताईनगरात मराठा समाजाची मागणी : मुक्ताईनगर तहसीलदारांना समाजबांधवांनी दिले निवेदन


मुक्ताईनगर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवराय यांच्याबद्दल अपमानजक वक्तव्य केल्याचा शहरातील मराठा समाजबांधवांनी निषेध केला आहे. राज्यपालांना तत्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी मुक्ताईनगर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

तत्काळ राज्यपालांना हटवावे
राज्यपालांच्या वक्तव्याने राज्यातील तमाम शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. या संदर्भात मुक्ताईनगरातून तालुका मराठा समाजबांधव व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना बुधवार, 2 मार्च रोजी निवेदन देऊन राज्यपाल कोशारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच राज्यपालांना तत्काळ पदावरून हटवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना मराठा समाज तालुकाध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव यु.डी.पाटील, सदस्य दिलीप पाटील, सदस्य ईश्वर रहाणे, मणियार बिरादरी जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी, मराठा समाज सदस्य दिनेश कदम, सदस्य संतोष मराठे, ललित बाविस्कर, छबीलदास पाटील, जितेंद्र पाटील, शेषराव पाटील, अमोल पाटील, उमेश देशमुख, सचिन पाटील, गौरव पाटील, रतीराम पाटील, गणेश पाटील, गोलू मुर्हे, कपिल पाटील, किरण महाजन, सचिन सपकाळ, यासीन खान, रवींद्र दांडगे, प्रवीण कांडेलकर, कृष्णा पाटील यांच्यासह असंख्य शिवप्रेमी व मराठा समाजबांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !