भुसावळात प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री उत्साहात
भुसावळ : शहरातील यावल रोडवरील प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात केंद्र संचालिका सिंधूदीदी यांच्या मार्गदर्शनात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक रमेश मकासरे, नगरसेविका लक्ष्मी मकासरे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवध्वज फडकविला गेला.
विविध कार्यक्रमांचे सादरीकरण
या प्रसंगी सिंधूदिदि यांनी शिव आणि शंकर यांच्यातील भेद स्पष्ट केला तसेच महाशिवरात्रीचे महत्व विषद करुन आपल्यातील कमजोर दुवे व दुर्गुण नष्ट करण्याची प्रेरणा दिली. स्व.लता मंगेशकर यांच्या शांती कार्याबद्दलही माहिती देण्यात आली. यावेळी मुलांनी स्वागत गीत प्रस्तुत केले. दीपादिदि यांनी महाशिवरात्री रहस्य व भारत स्वातंत्र्य अमृत महोत्सवबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन ज्योतीदीदी यांनी केले. यशस्वीतेसाठी अनिलभाई, नाना भाई, नितीन चौधरी, दिलीप महाजन, रीतेश भाई, स्वप्नील भाई, भरत भाई व परीकादीदी यांनी विशेष परीश्रम घेतले. सायंकाळी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात महाशिवरात्रीनिमित्ताने प्रदर्शनी व व्यसनमुक्तीबद्दल प्रबोधन करण्यात आले.


