सांगवी-हिंगोणा रस्त्यावर दुचाकी धडकल्या : दोन्ही दुचाकीस्वार गंभीर
यावल : यावल-फैजपूर मार्गावरील ‘सांगवी -हिंगोणा’ गावातील रस्त्याच्या मध्यभागी गुरुवारी दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास दोन दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. छोटू केसरसिंग बारेला यांची मोटरसायकल (क्रमांक एम.एच. 15 बी. 8833) व अब्दुत हाफीज यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.39 एक्स.0576) यांच्यात समोर समोरासमोर धडक झाली.
अपघातात दोन्ही दुचाकींवरील चालक जखमी
पेट्रोल पंप परीसरात दोन्ही दुचाकींमध्ये जोरदार धडकेत चोपडा येथील अब्दुल हाफीज आणि विटवा, ता.रावेर येथील 39 वर्षीय छोटू केसरसिंग बारेला हे दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. दोघांवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय आधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी तत्काळ प्रथमोपचार केले व नंतर त्यांना जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


