भुसावळ पालिकेची आजपासून धडक मोहिम : थकबाकी असलेल्या गाळ्यांना ठोकणार सील
भुसावळ : मार्च एण्ड जवळ आल्यानंतर भुसावळ पालिकेने थकीत वसुलीला वेग दिला असून शुक्रवारपासून थकबाकीदार असलेल्या गाळ्यांना सील लावण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. पालिकेची सुमारे एक कोटींची थकबाकी न भरणार्या सुमारे 400 गाळ्यांना सील लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एक कोटींची थकबाकी
गत आठवड्यात पालिकेतर्फे संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, दिनदयाल नगरजवळील व्यापारी संकुल, कपडा मार्केटमधील व्यापारी संकुल, डी.एस. हायस्कूल बाहेरील व्याापारी संकुल, जळगाव रोडवरील व्यापारी संकुल आदी व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे पालिकेची कराची सुमारे पाच लाख एक कोटींची थकबाकी आहे.


