यावल शहरातील वयोवृद्धाला बामणोद शिवारात बेदम मारहाण
फैजपूर : यावल शहरातील वयोवृद्धाला शिविगाळ करीत बांबूने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अरविंद धोंडू झोपे (65, रा.महाजन पुरी, यावल) असे जखमी वयोवृद्धाचे नाव आहे.
एकाविरोधात गुन्हा दाखल
अरविंद धोंडू झोपे (65, यावल) यांचे बामणोद शिवारातील शेट गट क्रमांक 45 मध्ये स्व-मालकीचे शेत आहे. गुरूवार, 3 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील केळीच्या पिकामध्ये सागर संतोष तायडे याने त्याचे म्हशी याने म्हशी चरण्यासाठी सोडल्या. दरम्यान केळीच्या बागेत घातलेल्या म्हशी बाहेर काढ, असे सागर तायडे याला सांगितल्यानंतर संशयीत सागरला राग आला व त्याने शेतात बाजूला पडलेल्या बांबूने अरविंद झोपे यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अरविंद झोपे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी सागर संतोष तायडे (रा.बामणोद, ता.यावल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विकास सोनवणे हे करीत आहे.
-
नापिकीनंतर कर्जबाजारी तरुणाने केली चक्क अफूची शेती : चोपडा तालुक्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांची कारवाई


