डिगंबर महाराज वारकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी
सावदा : डिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती, रावेर व यावल तालुका संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांना रविवारी मंजुरी देण्यात आली. चिनावल येथील स्व.वाय.एस.पाटील सभागृहात संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
पंढरपूर येथील वाड्यात वारकर्यांसाठी असलेल्या विविध नवीन उपाययोजना राबवाव्यात तसेच बांधकाम व सभासदबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक मंडळ निवडीच्या विषयावर चर्चा होत असताना विद्यमान संचालक मंडळाला नवीन संचालक निवडण्याचे अधिकार देण्यात आले.
यांची सभेला उपस्थिती
सभेसाठी संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे, संचालक मंडळ तसेच रावेर-यावलचे आमदार शिरीष चौधरी, धनंजय चौधरी, सावदा पोलिस ठाण्याचे समाधान गायकवाड, शरद महाजन, घनश्याम पाटील, रमेश महाजन, विजय महाजन , डॉ.इंगळे, विठ्ठल भंगाळे, किशोर बोरोले, जनार्दन भारंबे, जयराम पाटील, मधुकर बोंडे, रमेश भंगाळे, कल्पेश नेमाडे, सुनील भंगाळे, विनायक गारसे, विजय ढाके, गीताताई चौधरी, आशा तळेले, त्र्यंबक चौधरी, हभप दुर्गादास महाराज व संत मंडळी व संस्थेचे सर्व संचालक, रावेर, यावल तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


