लेडीज रनच्या पहिल्या प्रशिक्षण पर्वास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे 27 मार्च रोजी लेडीज इक्वलिटी रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षण व सराव शिबिरास रविवार, 6 मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी व सहभागी धावपटू रूपा अग्रवाल यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून विधीवत प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्रवीण फालक होते.

स्पर्धेबद्दल मार्गदर्शन
फालक यांनी धावण्याच्या आधी करावयाचा वॉर्मअप, धावताना आपण कुठली काळजी घ्यावी व धावल्यानंतर आवश्यक असलेली स्ट्रेचिंग एक्झरसाइज याविषयी मार्गदर्शन केले. आरती चौधरी यांनी अधिकाधिक महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. रूपा अग्रवाल, डॉ.नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी मार्गदर्शन केले. 27 मार्च रोजी आयोजित या रनमध्ये आतापर्यंत 200 महिलांनी नावनोंदणी केली आहे. नावनोंदणी करावी, असे आवाहन यावेळी योगशिक्षिका पूनम भंगाळे, डॉ.स्वाती फालक, पूजा बलके, झुंबा ट्रेनर पारुल वर्मा, नीलांबरी शिंदे, मीना नेरकर, सुवर्णा पाटील, प्रिया पाटील, सीमा पाटील, डॉ.शीतल चोरडिया, चारुलता अजय पाटील, सरला पाटील, हर्षा लोखंडे, ममता ठाकूर या महिला सदस्यांतर्फे करण्यात आले.

52 महिलांचा सहभाग
रविवारी आयोजित 3 ते 5 किमीच्या रनमध्ये 52 महिलांनी सहभाग नोंदविला. यामध्ये डॉ.संज्योत पाटील, आराधना तांबे, छाया चौधरी, चित्रा करकरे, भावना झा सिंग, डॉ.वर्षा वाडीले, इंदिरा सोनगिरे, सुनीता वाघमारे, मंगला पाटील, भावना देशमुख, सरला कोल्हारकर, रीया कोलारकर या महिला स्पर्धकांनी यशस्वी सहभाग नोंदविला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !